लाहोर : पाकिस्तानमधील लाहोर शहरातील अल्लामा इक्बाल विमानतळाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. त्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.विमातळावर शेकडो प्रवासी अडकून पडले असून बचाव पथक आग नियंत्रणात आणण्यासाठीं प्रयत्न करत आहेत. विमानतळाला आग लागल्याच्या वृत्ताने देशभरात गोेंधळ उडाला. भीषण आगीमुळे विमानतळाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली. सर्व उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली असून शेकडो प्रवासी अडकून पडले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णत: यश आलेले नाही. दरम्यान, विमानतळाला आग लागण्याची ही पहिली घटना नाह. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची आग लागली होती. खराब व्यवस्थापन आणि सुरक्षा मानकांचे अज्ञानाकडे दुलर्ंक्ष केल्याचे ते परिणाम आहेत. गेल्या वर्षी ९ मे रोजी विमानतळाच्या इमिग्रेशन काउंटरच्या छताला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यामुळे यंत्रणा बंद पडली होती.
Fans
Followers